महाराष्ट्र जनमत न्यूज “दोषींना अभय का? कारवाई करा, अन्यथा जनआक्रोशाचा उद्रेक अटळ!” अमळनेर तालुक्यातील कथित रंगीत झेरॉक्स स्टॅम्प वापरून ऑनलाइन नोंदणी प्रकरण आता चांगलेच तापले असून, या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मैदानात उतरली असून प्रशासनाला थेट अल्टिमेटम देण्यात आला आहे. अॅड. अभिजित बिन्हाडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित प्रकरणात चौकशी, अहवाल आणि पत्रव्यवहार झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. “कारवाई थांबली कुठे आणि कोणासाठी?” जनतेत आता एकच चर्चा रंगली आहे— “जर सर्व काही नियमाप्रमाणे झाले असेल तर तक्रारींची मालिका का सुरू आहे?” “आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर दोषींवर कारवाई का होत नाही?” या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. ⚠️ १० जूनला तहसील कार्यालयासमोर बहुसंख्येने उपोषण प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास १० जून २०२६ रोजी अमळनेर तहसील कार्यालयासमोर बहुसंख्येने उपोषण आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. RPI कार्यकर्त्यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ एका प्रकरणासाठी नसून “गैरप्रकार, दिरंगाई आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधातील लढा” आहे. 💥 प्रशासनासाठी धोक्याची घंटा?तालुक्यात या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू असून, आगामी आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १० जून हा दिवस प्रशासनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. RPI चा इशारा “दोषींवर कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर सुरू होणारे उपोषण आंदोलन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधातील जनआंदोलन ठरेल!” “कारवाई नाही तर उपोषण; प्रशासनाला अंतिम इशारा!” 📰 महाराष्ट्र जनमत न्यूज | विशेष धडाकेबाज वृत्त 🔥🔥🔥 Post navigation 🚨 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष अभिजीत बिऱ्हाडे यांचा गंभीर आरोप! 🚨 अमळनेरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; अहिल्यादेवी जयंतीनिमित्त समाजसेवेचा अनोखा संदेश