महाराष्ट्र जनमन न्यूज महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून विवाह मंडळाची फसवणूक; ‘महाराष्ट्र जनमत न्यूज’ने वृत्त लावून धरताच कारवाई! तहसील कार्यालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार करणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्र जन मत न्यूज ने या संदर्भातील फॅक्ट्स आणि प्रशासकीय दिरंगाई उघडकीस आणल्यानंतर, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले. या वृत्ताची थेट दखल घेत अमळनेर पोलीस स्टेशनला ३ संशयितांविरुद्ध गंभीर कलमांन्वये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रांत अधिकारी) तक्रार केली होती. मात्र, महसूल प्रशासनाकडून कारवाईसाठी दिरंगाई होत असतानाच महाराष्ट्र जनमत न्यूज’ ने या प्रकरणातील कागदपत्रे आणि फॅक्ट्स समोर आणून प्रशासनाला जाब विचारला होता. चौकशी समितीसमोर आरोपींची पळता भुई थोडी! तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या समितीने चौकशीचे चक्र फिरवले. समितीने संशयितांना त्यांचे मूळ प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणि बाजू मांडण्यासाठी ६ मे २०२६ आणि १२ मे २०२६ अशी वारंवार मुदत दिली. परंतु, आपण पकडले जाऊ या भीतीने संशयित आरोपींनी चौकशीला हजर राहण्याचे टाळले आणि मूळ कागदपत्रे लपवून ठेवली. समितीने अंतिम चौकशीअंती निष्पन्न केले की, संशयितांनी जाणीवपूर्वक बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे. अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल (गुन्हा र.नं. २८१/२०२६) तहसीलदार यांच्या अंतिम आदेशानंतर आणि वरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीने सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३४२, ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र जनमत न्यूज चा शब्द: बातमी नाही, तर थेट न्याय! शासकीय कार्यालयांमध्ये बसून सर्वसामान्यांची आणि प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या एजंट आणि बनावट टोळ्यांवर ‘महाराष्ट्र जन मत न्यूज’ची नेहमीच करडी नजर राहिली आहे. हे वृत्त केवळ बातमी पुरते मर्यादित न ठेवता प्रशासनाला गुन्हा दाखल करायला लावणे, हा महाराष्ट्र जन मत न्यूज’ च्या सुजाण पत्रकारितेचा आणि वाचकांच्या विश्वासाचा मोठा विजय आहे! या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करत असून, या बनावट रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता घेतला जात आहे. Post navigation अमळनेरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; अहिल्यादेवी जयंतीनिमित्त समाजसेवेचा अनोखा संदेश महाराष्ट्र जनमत न्यूज इम्पॅक्ट माजी नगरसेवकांच्या आव्हानानंतर प्रशासन खडबडून जागे!