मुख्य संपादक…परेश उदेवाल

महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह |

 

अमळनेर शहरातील संत सखाराम महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून, यंदाच्या यात्रेत पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. विशेषतः पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी होत असताना वाहतूक नियंत्रण, बंदोबस्त, महिला सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष तसेच प्रत्येक ठिकाणी पोलिसांची काटेकोर नजर असल्यामुळे यात्रा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब यांनी स्वतः मैदानात उतरून विविध भागांची पाहणी करत नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले. त्यांच्या नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांकडून देखील पोलिस प्रशासनाच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात असून, “यात्रेत प्रथमच एवढे शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळाले,” अशा प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहेत.

संत सखाराम महाराज यात्रा उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब व संपूर्ण पोलिस प्रशासन अभिनंदनास पात्र ठरत आहेत.

 

*🔥*महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह*

“जनतेचा आवाज… थेट प्रशासनापर्यंत!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *