महाराष्ट्र जनमत न्यूज

मध्यरात्री २ ते ३ वाजता व्हॉट्सअपवर दबावाचे मेसेज; “क्लीन चीट मिळाली… तुझ्याकडून काही होणार नाही” म्हणत दडपशाहीचा प्रयत्न !

अमळनेर शहरात गांधली जलशुद्धीकरण केंद्रावरून जिल्हा परिषद शाळेला देण्यात आलेल्या कथित अवैध नळ कनेक्शन प्रकरणाने आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. कारण या गंभीर प्रकरणावर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मध्यरात्रीच काही तथाकथित सत्ताधारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेजचा पाऊस पाडत “क्लीन चीट मिळाली आहे… तुझे उपोषण करून काही होणार नाही… तुझ्याकडून काही होणार नाही…” अशा भाषेत मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे

प्रश्न असा उपस्थित होत आहे की,

👉 जर सर्व काही नियमात आणि पारदर्शक असेल, तर मग मध्यरात्रीच्या अंधारात घाबरून मेसेज का करावे लागले?

👉 सत्य बाहेर येण्याची एवढी भीती कोणाला वाटतेय?

👉 उपोषणाच्या एका इशाऱ्यानेच जर एवढी धावपळ सुरू झाली असेल, तर पुढे अजून काय-काय बाहेर येणार?

नागरिकांमध्ये आता उघड चर्चा सुरू झाली असून “ज्यांनी स्वतःला क्लीन चीट दिली, त्यांनाच सत्याची सर्वाधिक भीती वाटत आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, संबंधितांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,

 “आमच्याकडे ठोस पुरावे आहेत… योग्य वेळी संपूर्ण सत्य शहरवासीयांसमोर आणले जाईल… मग कोण किती मोठा आहे हे जनतेसमोर स्पष्ट होईल!” 

⚠️ “आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य गप्प बसणार नाही… आता जनतेचा न्याय होणार!” ⚠️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *