महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहराच्या कायमस्वरूपी जलसंकटावर आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तब्बल १९४.५४ कोटी रुपयांच्या २४x७ पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या वेगाने सुरू असून, रविवारी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्वतः पाडळसरे धरण परिसरात जाऊन कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर हेही नगरसेवकांसह उपस्थित राहिल्याने राजकीय पातळीवरही अनेक चर्चांना उधाण आले. शहराच्या विकासासाठी आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचा स्पष्ट संदेश या पाहणीतून नागरिकांना मिळाला. 📍 कामांची स्थिती काय? पाडळसरे परिसरात इंटेकवेल, इन्स्पेक्शन वेल, जॅकवेल तसेच कनेक्टिंग मेनचे काम जोरात सुरू आहे. सध्या योजनेचे २० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला गती देण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 📍 योजनेची मोठी वैशिष्ट्ये: ✅ शहरात २२१.५ किमी पैकी १२ किमीपेक्षा अधिक पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण ✅ २८ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणी प्रगतिपथावर ✅ १८.६० लाख लिटर व २१.५८ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभांचे काम सुरू ✅ सोलर प्रकल्पामुळे भविष्यात वीज बिलात मोठी बचत या योजनेमुळे अमळनेरकरांना भविष्यात दररोज नियमित व शुद्ध पाणी मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ थांबवण्यासाठी ही योजना “जलरक्षक” ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 💧 पाहणीदरम्यान आमदार अनिल पाटील यांनी कामाचा वेग वाढवण्याचे आदेश देत, “अमळनेरकरांना लवकरात लवकर दिलासा मिळाला पाहिजे,” असे स्पष्ट संकेत दिले. तर नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनीही कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. 🔥 राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा दौरा आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. अमळनेरकरांच्या नजरा आता या महत्त्वाकांक्षी योजनेकडे लागल्या असून, “२४x७ पाणीपुरवठा” हे स्वप्न प्रत्यक्षात कधी उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 🚰 Post navigation गांधलीपुरा बोरी नदी पुल प्रकरण पेटले; “कोट्यवधी खर्चून पूल उभा, पण रस्ता गायब!” आम आदमी पार्टीचा प्रशासनावर घणाघात उपोषणाच्या इशाऱ्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली ?”