महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, १२ वर्षीय निष्पाप बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अमळनेर पोलिसांनी अवघ्या ९ तासांत अटक करून कायद्याचा धाक दाखवला आहे.

माहितीनुसार, परिसरातीलच शिल्या उर्फ साहिल शेख या संशयिताने घरात कोणी नसल्याची संधी साधत थेट घरात प्रवेश केला. झोपलेल्या अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला. घाबरलेल्या बालिकेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून अमानुष कृत्य सुरूच ठेवले.

मात्र, नियतीने साथ दिली आणि त्याचवेळी बालिकेची आजी घरी परतली. दरवाजा उघडताच समोरचे भयावह दृश्य पाहून आजीने आरोपीला जाब विचारला. पकडले जाण्याच्या भीतीने नराधमाने वृद्ध महिलेला धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर हादरलेल्या बालिकेने संपूर्ण प्रकार सांगताच कुटुंबीयांनी थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठले.

⚖️ या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील गंभीर कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

🔥 या संतापजनक घटनेमुळे अमळनेरमध्ये संतापाची लाट उसळली असून, “अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *