महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह | मुख्य संपादक…परेश उदेवाल अमळनेर नगर परिषद हद्दीतील गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळ कनेक्शन प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत असून, तब्बल 35 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. सदर प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच काही पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत असतानाही अद्याप 𝙁𝙄𝙍 नाही, निलंबन नाही, चौकशीचा वेग नाही त्यामुळे “मुख्याधिकारी साहेब कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?” असा थेट सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठ्या गाजावाजात नोटिसा बजावण्यात आल्या, खुलासे मागवण्यात आले; मात्र त्यानंतर संपूर्ण प्रकरण जणू थंडबस्त्यात टाकण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या मते, “जर सामान्य नागरिकाने असा गैरप्रकार केला असता तर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती; मग अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर मेहरबानी का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. 💥 नगरपालिकेच्या महसुलाला लाखोंचा फटका? अवैध नळ कनेक्शनमुळे नगरपालिकेच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप असून, तरीही प्रशासनाकडून संशयास्पद शांतता पाळली जात असल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. जनतेचा इशारा अधिक तीव्र स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत दोषींवर 𝙁𝙄𝙍, निलंबन व फौजदारी कारवाई न झाल्यास अमळनेर नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन, धरणे, उपोषण आणि मोर्चा काढण्यात येईल. “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही जनता माफ करणार नाही,” अशा संतप्त प्रतिक्रिया आता सोशल मीडियावरही उमटू लागल्या आहेत. 🔥आता जनतेचा एकच सवाल — 👉35 दिवस झाले… कारवाई अजून किती दिवसांनी? 👉मुख्याधिकारी साहेबांची शांतता नेमकी कुणासाठी? 🛑 महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह “जनतेचा आवाज… थेट प्रशासनापर्यंत!” Post navigation 🚨 अमळनेर तालुक्यात खळबळ! 🚨 कचरे गावातील ३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ व्यक्त वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवेचा अनोखा आदर्श; तिन्ही भावांकडून गंधमुक्ती दिवशी रुग्णांसाठी शवपेटी अर्पण”