म्हाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक..परेश उदेवाल अमळनेर शहरातील सेवाभावी शिंगाणे परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण करत गंधमुक्तीच्या दिवशी समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. वडील कै. पंडित बाबुलाल भोंई (शिंगाणे) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिन्ही भावांनी रुग्णसेवा आणि समाजसेवेचा अनोखा वारसा जपत समाजासाठी शवपेटी अर्पण केली. कै. पंडित भोंई हे साधी राहणी, प्रेमळ स्वभाव आणि समाजाशी घट्ट नाळ जोडणारे व्यक्तिमत्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनानंतर शिंगाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी वडिलांनी दिलेले संस्कार जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार तिन्ही भावांनी केला. सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे, नितीन शिंगाणे आणि डॉ. सुनील शिंगाणे यांनी पुढाकार घेत ही शवपेटी समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली. या माध्यमातून गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मनोज शिंगाणे यांनी यापूर्वी रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे, तर डॉ. सुनील शिंगाणे यांनी कोरोना काळात रुग्णसेवेत मोलाचे योगदान दिले होते. आता वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त केलेल्या या समाजोपयोगी कार्यामुळे शिंगाणे परिवार पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रसंगी समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “माणूस जातो, पण त्याचे संस्कार आणि समाजासाठी केलेले कार्य कायम जिवंत राहते,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. Post navigation 35 दिवस उलटले… कारवाई अजूनही शून्य! अवैध नळ कनेक्शन प्रकरणावर संशयाची सावली अमळनेर नगरपरिषदेची पावसाळापूर्व धडाकेबाज मोहीम शहरातील मुख्य नाले व गटारींची युद्धपातळीवर सफाई; नागरिकांना दिलासा