महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक परेश उदेवाल अमळनेर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर स्वच्छता व नालेसफाईची धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, शहरातील मुख्य नाले तसेच लहान-मोठ्या गटारींमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या तुंबलेल्या नाल्यांचा त्रास, दुर्गंधी आणि साचलेल्या पाण्यापासून मोठा दिलासा मिळत आहे. मुख्याधिकारी गणेश जी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई मोहीम राबवली जात आहे. अनेक वर्षांपासून गाळ साचलेल्या नाल्यांची विशेष यंत्रणेद्वारे साफसफाई केली जात असून, पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक संतोष जाधव साहेब, आरोग्य निरीक्षक किरण कडारे साहेब, आरोग्य निरीक्षक संतोष माणिक साहेब यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत असून, प्रत्येक भागातील नाले व गटारींची प्रत्यक्ष पाहणी करून सफाईची कामे प्रभावीपणे पूर्ण केली जात आहेत. नगरपरिषदेच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “पावसाळ्यापूर्वीच प्रशासन अॅक्शन मोडमध्ये” असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. शहर स्वच्छ व तुंबामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेली ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. Post navigation वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवेचा अनोखा आदर्श; तिन्ही भावांकडून गंधमुक्ती दिवशी रुग्णांसाठी शवपेटी अर्पण” ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान आमदारांचा संताप; दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश