महाराष्ट्र जनमत न्यूज मुख्य संपादक परेश उदेवाल रुग्णालयातील सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास येताच संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे कडक आदेश देत, रखडलेल्या कामाबाबत जबाबदारांवर कारवाईचा इशाराही दिला. वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करून त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तुटलेले दरवाजे बदलण्याचे आदेश देत रुग्णालयातील स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. रुग्णालयातील बेडशीट अस्वच्छ असल्याचे आढळल्यानंतर आमदारांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. “रुग्णांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला. यावेळी आमदारांनी प्रत्येक विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्षाचीही पाहणी करण्यात आली. या कक्षात कुलर, थंड पाणी, औषधसाठा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील, बांधकाम अभियंता भगवान माळी व कर्मचारी उपस्थित होते. Post navigation अमळनेर नगरपरिषदेची पावसाळापूर्व धडाकेबाज मोहीम शहरातील मुख्य नाले व गटारींची युद्धपातळीवर सफाई; नागरिकांना दिलासा अवैध नळ कनेक्शन प्रकरणी प्रशासनाविरोधात अन्नत्याग उपोषणाचा इशारा”