महाराष्ट्र जनमत न्यूज

मुख्य संपादक परेश उदेवाल

नरेंद्र चौधरी यांनी अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांसाठी सुरू केलेला मोफत R.O फिल्टर पाणी वाटप उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कडक उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असताना चौधरी यांनी पुढाकार घेत दररोज थंडगार व शुद्ध पाणी घरपोच उपलब्ध करून देत मानवतेचा खरा झरा उघडला आहे.

विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित नसून वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. कलाविष्णू बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून “जनतेची सेवा हाच खरा धर्म, जनतेची सेवा हाच आमचा संकल्प” या भावनेतून ही जलसेवा राबवली जात आहे.

आजच्या राजकारणात निवडणूक संपली की अनेक जण जनतेपासून दूर जातात, मात्र पराभवानंतरही प्रभागाचे पालकत्व स्वीकारून नागरिकांच्या सेवेसाठी सतत झटणारे नरेंद्र चौधरी हे वेगळेपण जपत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मोफत R.O पाणी वाटप ही केवळ सेवा नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी, संवेदनशीलता आणि माणुसकीचा जिवंत आदर्श असल्याचे बोलले जात आहे.

“जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहून दिलासा देणे हेच आमचे कर्तव्य आहे. जनहिताच्या कार्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध राहू,” अशी भावना नरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

कडक उन्हाळ्यात नागरिकांना मिळणाऱ्या या मोठ्या दिलाशामुळे प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, “राजकारणापेक्षा समाजकारण मोठे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *