महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरातील ३ जुलै रोजी उघडकीस आलेल्या गोवंश कत्तल प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले असून, या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एलसीबीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे तसेच तीन जिवंत बैल जप्त करण्यात आले. या घटनेचे स्वरूप अत्यंत गंभीर असून, ही केवळ एकच घटना नसून यामागे मोठे जाळे कार्यरत असण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.? 

विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

  • जप्त करण्यात आलेल्या जनावरांचा उगम, वाहतूक, साठवणूक आणि संपूर्ण पुरवठा साखळीची सखोल चौकशी करावी.
  • या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.
  • केवळ घटनास्थळी आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा.
  • तपासाची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी.
  • शहरातील इतर ठिकाणीही अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

निवेदनात नगरपरिषद हद्दीतील कत्तलखान्यांची परवानगी, नोंदी, तपासणी आणि देखरेखीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गोसंरक्षणाच्या बाबतीत प्रशासनाने ठोस आणि प्रभावी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई केली नाही तर तीव्र जनआंदोलन, जनआक्रोश मोर्चा तसेच आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या निवेदनावेळी  विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एक हजाराहून अधिक हिंदुत्वनिष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!