महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरावर काळाने घाला घातला असून चौपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरातील तिघे अल्पवयीन मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिघांना पाण्याबाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलांची ओळख आणि घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पावसाळ्यात पाण्याने भरलेले खोल खड्डे, तलाव आणि धोकादायक ठिकाणे सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. अशा ठिकाणी तातडीने संरक्षण भिंत, इशारा फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. “तीन निरागस जीवांचा दुर्दैवी अंत हा संपूर्ण अमळनेरसाठी मोठा धक्का आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र जनमत न्यूज सहभागी आहे.” 🙏🕯️ Post navigation अंमळनेर अग्निशमन विभागात एकही प्रशिक्षित फायरमन नाही; नगरपरिषदेनेच लेखी कबुली दिली! आता मोठी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी