महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरातील शालम नगर परिसरात भुयारी गटारीच्या ड्रेनेजचे दूषित पाणी थेट विहिरीमध्ये जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी शिंदे साहेब यांनी कोणताही विलंब न करता स्वतः घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक किरण कडारे साहेब तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून ड्रेनेजचे दूषित पाणी विहिरीत जाणे त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.

मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामावर देखरेख ठेवत आवश्यक उपाययोजना करून ड्रेनेजच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली.

इतकेच नव्हे, तर दूषित झालेल्या विहिरीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही हानी होऊ नये यासाठीही नगर परिषदेकडून आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या.

मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांच्या या तातडीच्या आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे शालम नगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देऊन स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून काम करून घेणारे अधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमळनेर शहराला गणेश शिंदे साहेब यांच्यासारखे कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि कृतीशील मुख्याधिकारी लाभणे ही निश्चितच शहरासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या जनहिताच्या कार्याला नागरिकांकडून मनापासून सलाम करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!