महाराष्ट्र जनमत न्युज

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. एस.टी. बस, कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर-धुळे महामार्गावरील वृंदावन हॉटेलसमोर सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. धडक इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर मोटारसायकल अनेक फूट दूर फेकली गेली. अपघाताचे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरून गेले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब स्वतः संपूर्ण टीम घेऊन मदत कार्य वेगाने सुरू केले प्रशासन आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

⚫ तालुक्यात शोककळा

या भीषण दुर्घटनेने अमळनेर तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

“एका क्षणात सहा कुटुंबांचा आधार हरपला; मंगरूळ येथील हा अपघात अमळनेरच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी घटनांपैकी एक ठरत आहे.” 🕯️🙏

– महाराष्ट्र जनमत न्यूज 📰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *