महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी मा. गणेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, डिजिटल होर्डिंग्ज, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फलक तसेच विद्युत खांबांवर लावण्यात आलेली अनधिकृत जाहिरात सामग्री हटविण्यात आली. या विशेष कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्यामजी अग्रवाल साहेब यांच्या पथकाने शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक, व्यापारी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी पाहणी करून नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेले डिजिटल होर्डिंग्ज व जाहिरात फलक उतरविले. नगर परिषद प्रशासनाने शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे, वाहतूक सुरळीत राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने ही मोहीम हाती घेतल्याचे सांगितले. अनधिकृत होर्डिंग्जमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे तसेच विद्युत खांबांवरील जाहिरातींमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख चौक व रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनीही नगर परिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तसेच यापुढेही अनधिकृत बॅनर, पोस्टर्स व डिजिटल होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. “स्वच्छ, सुंदर आणि सुस्थित अमळनेर” या संकल्पनेला बळ देणारी नगर परिषदेची ही कारवाई शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे. Post navigation 🌧️ अमळनेर शहरात जोरदार पावसाची हजेरी; अमळनेरकरांना मोठा दिलासा! 🌧️ नगरसेवक पंकज भाऊ चौधरी यांची दमदार साथ अमळनेरच्या हरित क्रांतीला वेग! महिला हौसिंग ट्रस्टच्या वृक्षारोपण साथ