महाराष्ट्र जनमत न्यूज

संपूर्ण महाराष्ट्रात यंदा तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत अमळनेर शहरालाही पाणीपुरवठ्याच्या काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीच्या पात्रात पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाल्याने अमळनेर नगर परिषदेला पर्यायी व्यवस्था म्हणून कलाली येथून पाणी आणण्याची प्रक्रिया राबवावी लागत आहे.

यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठा एक ते दोन दिवस उशिराने होत असला तरी नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

विशेष म्हणजे, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब स्वतः २४ तास पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवून असून शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी सातत्याने आढावा घेत आहेत.

तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील साहेब संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाणी उपसा, वितरण, आवर्तन आणि तांत्रिक बाबींचे नियोजन करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.

नगर परिषदेकडून आवश्यक आवर्तन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पर्यायी जलस्रोतांचा वापर करून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ही समस्या केवळ अमळनेरपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

मुख्याधिकारी गणेश शिंदे, पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील आणि प्रवीणकुमार बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाणीपुरवठा विभाग नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असून लवकरच परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

त्यामुळे अमळनेरकर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, पाण्याचा जपून वापर करावा आणि अमळनेर नगर परिषद पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

— महाराष्ट्र जनमत न्यूज 📰
“जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *