महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरातील बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढणारी अवैध वाहतूक, बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांची होणारी पायमल्ली यावर अखेर पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेत शहरवासीयांचा विश्वास जिंकला आहे. डीवायएसपी विनायक कोते साहेब यांनी स्वतः मैदानात उतरून अचानक धडक तपासणी मोहीम राबवत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

अनेक दिवसांपासून बसस्थानक परिसरात अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या दुचाकी, रस्त्यावर निर्माण होणारे अडथळे आणि वाहतुकीची कोंडी यामुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले होते. मात्र डीवायएसपी कोते साहेब यांच्या या धाडसी आणि प्रशंसनीय कारवाईमुळे परिसरात शिस्त निर्माण होताना दिसत आहे. अचानक झालेल्या या कारवाईने नियम मोडणाऱ्यांचे अक्षरशः धाबे दणाणले असून, संपूर्ण परिसरात पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही दबाव किंवा पक्षपात न स्वीकारता सर्वांवर समान कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत पोलिस प्रशासनाचे कौतुक केले आहे.

या यशस्वी मोहिमेत पोलीस कर्मचारी हितेश बेहरे, उज्वल पाटील, गणेश पाटील तसेच शहर वाहतूक नियंत्रण पथकाने अत्यंत तत्परतेने सहभाग नोंदवत कारवाई यशस्वी केली.

⭐ नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

डीवायएसपी विनायक कोते साहेब यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली ही पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असून, अशा कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

🚨 “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही!”

डीवायएसपी विनायक कोते साहेब यांच्या या धडक आणि जनहिताच्या कारवाईमुळे अमळनेरमध्ये वाहतूक शिस्तीचा नवा आदर्श निर्माण झाला असून, नियम मोडणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे — “वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा कारवाईस सामोरे जाण्यास तयार रहा!” 🚔💐👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *