महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरात कचऱ्याच्या घंटागाडीतून बेवारस मृतदेहाची वाहतूक झाल्याच्या धक्कादायक प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते परेश रवींद्र उदेवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अखेर अमळनेर नगर परिषद प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, संबंधित कचरा वाहतूक ठेकेदार एम.एस.आर. ग्रीन इन्फ्रापॉवर, नाशिक यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेत कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका ठेवत संबंधित आरोग्य निरीक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सह आयुक्त, नगर परिषद शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु आरोग्य निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी निवड शिस्तभंगाची कारवाई प्रस्ताव का? त्यांच्यावर बेवारस प्रेताची अंत्यसंस्काराची जबाबदारी होती नाही का? या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांनी नगर परिषदेकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. “मृतदेहाचा अपमान सहन केला जाणार नाही!” परेश उदेवाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा कोणत्याही एका व्यक्तीचा विजय नाही, तर अमळनेरकर नागरिकांच्या एकजुटीचा आणि मानवतेच्या सन्मानाचा विजय आहे. मृतदेहाची विटंबना करणाऱ्यांना कायद्यापुढे उत्तर द्यावेच लागेल. मात्र, या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर अंतिम आणि कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” या कारवाईमुळे प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आता पुढील चौकशी आणि शिस्तभंगाची प्रक्रिया कशी पुढे जाते याकडे संपूर्ण अमळनेरचे लक्ष लागले आहे. “मृत्यूमध्येही माणसाचा सन्मान अबाधित राहिलाच पाहिजे; हीच या लढ्याची खरी भूमिका आहे.” Post navigation 🚨 अखेर सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल मैदानात! कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह वाहतूक प्रकरण दोषींवर कारवाईची ठाम मागणी प्रति पंढरपूर संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग; प्रशासन, सेवेकरी व नागरिकांच्या एकजुटीने टळली मोठी दुर्घटना!