महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच वाडी संस्थानातील सेवेकरी, भाविक तसेच अमळनेर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. सर्वांनी एकजुटीने मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. त्यांनी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान, घटनास्थळी प्रांत अधिकारी साहेब तहसीलदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब तसेच पोलीस निरीक्षक साहेब यांनीही उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देत संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने काम केले.

सेवेकरी, भाविक, नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. संकटाच्या प्रसंगी दाखविलेली ही एकजूट आणि तत्परता अमळनेरकरांसाठी प्रेरणादायी ठरली असून, नागरिकांकडून मुख्याधिकारी गणेश शिंदे व संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!